शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर करून पिंपळनेर शहरांतर्गत रस्त्यांच्या कामाचा सपाटा लावला मात्र पिंपळनेर नगर परिषद हद्दीतील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा गंभीर आरोप पिंपळनेरचे माजी उपसरपंच योगेश नेरकर यांनी केला आहे.विशेष बाब म्हणजे थेट मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी बोलावून त्यांनी रस्ते कामाच्या दर्जाबाबत कानउघाडणी केली आहे.पिंपळनेर शहरातील नागरिक पिंपळनेर-सटाणा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे आधीच त