राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्याचा रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सहकार मंत्री श्री. पाटील हे ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अहमदपूर तालुक्यातील भक्तिस्थळ येथे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजिवन समाधी सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे राखीव. रात्री ८.३० वाजता ताजबंद येथून लातूरकडे व रात्री १०.३० वाजता लातूर इथून मुंबईकडे प्रयाण करतील