महागाव शहरातील प्रभाग क्र.११ मधील हनुमान मंदिराजवळ नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान संपन्न झाले. नगरसेविका आशा बावणे यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले असून मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. भूमिपूजन सोहळा प्रतिष्ठित व्यक्ती भगवानराव नरवाडे पाटील व हनुमान देवस्थान आरती प्रमुख दिगंबरराव गाडबैले यांच्या हस्ते पार पडला.