जिल्हा कारागृहातील एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. बीड जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतले जात असल्याचं समोर आला आहे. सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यात दहा वर्षांची जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे.याच कैद्यांकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी धुतली जात आहे. शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार देखील करत असल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.