धुळे शहरातील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने भाविक नाराज होते. या समस्येची आमदार अनुप अग्रवाल यांनी दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी चेतन मंडोरे यांनी स्वखर्चाने मालेगाव क्रॉसिंग ते आग्रा रोड परिसरातील धोकादायक खड्डे मुरूम टाकून बुजवले. दरवर्षी विसर्जनापूर्वी मनपा खड्डे बुजवत असली तरी यंदा कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांना पुढाकार घ्यावा लागला.