दत्तापूर येथे मोफत आरोग्य तपासणी रक्तदान कार्यक्रम आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी महिला, पुरुष, वृद्ध यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचा लाभ घेतला तपासण्या करून औषधीचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी मोफत औषधी वाटप ऑपरेशन करिता भरती होण्याची सोय ,डॉक्टरांच्या सल्ल्याने पेशंटला अधिक तपासण्या ,हॉस्पिटलमध्ये नेने, जेवणाची मोफत व्यवस्था अशा विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन एकाच वेळी करण्यात आले.