लातूर -जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 60 महसूल मंडळांपैकी तब्बल 29 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे नदी-ओढ्यांची पाणीपातळी वाढली असून अनेक रस्ते व पुलांवरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार 29 ऑगस्ट 2025 रोजीदेखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.