बार्शी-कुर्डवाडी रोडवरील अलीपूर पुलावर दोन दिवसांपूर्वी चुकीच्या दिशेने आलेल्या बसने समोरून दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रमेश उत्तरेश्वर गाडे (रा. बार्शी) हा गंभीर खमी झाला आहे. या अपघातात दुचाकीसह बस पुलाच्या खाली गेली. याप्रकरणी परांडा आगाराचे बसचालक विश्वजीत व्यंकटेश सुतार यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.