कावठी ग्रामस्थांनी कुसुंबा-कावठी मार्गावरील एसटी बसच्या अन्यायकारक भाडेवाढीविरोधात धुळे विभाग नियंत्रकांना निवेदन दिले. पूर्वीचे १० रुपये तिकीट आता १६ रुपये झाले असून, विद्यार्थ्यांचा मासिक पास १६० वरून थेट ३०० रुपयांवर गेला आहे. अवघ्या ५-६ किमी अंतर असूनही दीड टप्प्याचे भाडे आकारल्याचा आरोप करण्यात आला. दरवाढीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येणार असल्याचे सांगत, भाडे कमी करणे व सकाळी अतिरिक्त बस फेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली.