उत्तराखंड मध्ये अडकलेले जळगाव येथील मेहरा कुटुंबीय हे सुखरूप परतले असून भुसावळ रेल्वे स्थानकावर अनामिका मेहरा आरोही मेहरा यांचे नातेवाईकांनी स्वागत केले. उत्तराखंड मध्ये झालेल्या ढगफुटीमुळे मेहरा कुटुंबियांचा संपर्क होत नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढली होती महाराष्ट्र सरकार व उत्तराखंड सरकार तसेच सैन्य दल व प्रशासन यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने आपण सुखरूप परतल्याची भावना अनामिका मेहरा यांनी व्यक्त केली आहे तसेच उत्तराखंडमध्ये घटनेची माहिती प्रसार माध्यमांना दिली.