पेठ सांगली महामार्गावर बावची (ता. वाळवा) फाट्याजवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून पाच मेंढ्यांसह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव संजय आनंदा धनवडे (वय 50, रा. दुधगाव, ता. मिरज) असे असून त्यांचा मृत्यू जागीच झाला. तर दुचाकीवरील संदीप आदिनाथ पाटील (वय 32, रा. दुधगाव) व कळप घेऊन जाणारे मेंढपाळ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत