बुलढाणा वन परिक्षेत्रातील शेळगाव आटोळ ते अंचरवाडी रस्त्या जवळ एका शेता जवळ काळवीटाची शिकार करुन मास विक्रीच्या ठिकाणावर बुलढाणा वन विभागाने काल धाड टाकून 1 कापलेला व 1 जिवंत काळवीट,1 मोटरसायकल, काळवीटाचे 4 चामडे,चाकू,सूरी व शिकारचे इतर साहित्य जप्त केला होतं.चिखली कोर्टाच्या आदेशाने आज जप्त केलेला मास व इतर अवयव बुलढाणा वनविभागाच्या लाकूड आगारात जाळून नष्ट करण्यात आला आहे.