रत्नागिरी : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र गावडे व जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिताली मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे.धावपळीच्या जीवनशैलीत निरामय आरोग्यासाठी सर्व नागरिकांनी योग साधना अंगीकारावी असे जिल्हा परिषद आरोग्य विभागा कडून आवाहन करण्यात येत आहे.