औसा -आ.अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने औसा मतदारसंघात जलसमृद्ध औसा अभियान हाती घेण्यात आले असून या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच औसा येथे जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कामाला अधिक गती देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने जलसंधारण क्षेत्रातील आदर्श ठरलेल्या शिरपूर पॅटर्नचे मुख्य शास्त्रीय मार्गदर्शक, ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ तथा जलसंधारण तज्ज्ञ डॉ. सुरेश खानापूरकर व सेवानिवृत्त न्यायमूर्ती तथा जलतज्ज्ञ अंबादास जोशी यांच्यासह आमदार अभिमन्यू पवारनी दौरा केला.