सेनगांव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन सूचना दिल्या आहेत. सेनगांव तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी सेनगांव तालुक्यातील वरुड चक्रपान सह विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश मंडळांना विविध सूचना दिल्या व सेनगांव तालुक्यातील सर्व नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन देखील मस्के यांनी केले आहे.