दिग्रस तालुक्यातील देऊरवाडी येथे विजेच्या तुटलेल्या तारेमुळे मोठी घटना घडली. १५ दिवसांपूर्वी महादेव मंदिराजवळ विद्युत तार तुटल्याची माहिती सरपंच व ग्रामस्थांनी महावितरणकडे दिली होती. मात्र, महावितरण विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर या निष्काळजीपणाचा फटका ग्रामस्थांना बसला. रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान सय्यद कलीम सय्यद रहेमान यांच्या तब्बल १ लाख ५ हजार रुपये किमतीच्या म्हशीला तुटलेल्या वीज ताराचा करंट लागून ती जागीच ठार झाली.