गुडधी गावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात महिलांनी २४ ऑगस्ट रोजी समाजसेवक नितेश मुकिंदा किर्तक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. दारूच्या बाटल्या फोडून विक्री बंद केली. त्यानंतर, सूडबुद्धीने गावातील सिमा सुरवाडे हिने किर्तक यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या प्रकारामुळे गावकरी आणि महिलांनी पोलीस अधीक्षकांना कार्यालयावर मोर्चा काढून तब्बल एक तास हे आंदोलन दिलं व त्यानंतर पोलीस अधीक्षकांना निवेदन देत सखोल चौकशी व तक्रारदार महिलेची नार्को टेस्ट करावी.