आज सोमवार 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सरकारने कुणबी जात प्रमाणपत्रा संदर्भातला जीआर काढलेला असून त्या अनुषंगाने लवकरच जात प्रमाणपत्र वाटप करण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबर पर्यंत सरकारला मुदत दिलेली असून त्या अनुषंगाने माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सदरील माहिती आज रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.