पुलगाव पोलिसांकडून दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई केली नाचणगाव येथील लुंबिनी नगर परिसरात 2 आरोपींकडून दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे, पोलीस शिपाई अमोल आडे यांनी तात्काळ कारवाई करत 2आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ४३,२०० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या आणि ९५,००० रुपयांची मोपेड गाडी असा एकूण १ लाख ३८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर कारवाई 23ऑगस्ट रोजी करण्यात आली असून 24 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता प्रसिद्धीस दिले