कसबा बावडा येथील भाजी मंडई मध्ये अनेक शेतकरी, भाजी विक्रेते तसेच परिसरातील अनेक नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी येथे येत असतात. परंतु गेले अनेक दिवस मंडई मध्ये पावसाचे पाणी घुसत आहे. तसेच येथील विद्युत लॅम्प नादुरुस्त असल्याने मंडईला अंधाराने व्यापले आहे. यामुळे येथील विक्रेते व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आप च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शहर सचिव समीर लतीफ यांनी केले.