महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मागण्यांसाठी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर सुरु झालेले आमरण उपोषण प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता स्थगित करण्यात आले. महाव्यवस्थापक (क.व.औ.स.), मुख्य कामगार अधिकारी रा.प. मुंबई व प्रादेशिक व्यवस्थापक अमरावती यांच्या मध्यस्थीने २० सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व प्रवर्गांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा व अनुकंपा प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचा शब्द प्रशासनाने दिला. तसेच प्रलंबित वेतनवाढ फरक, तांत्रिक त्रुटींचे निराकरण