गोपाल आत्माराम गजबे वय ५१ रा. भिवखिडकी हा दिनांक २४ ऑगस्टच्या सकाळी ११:०० वा. गावा जवळच्या खोडया तलावात आंघोळ करण्याकरीता गेला होता. त्याचे प्रेत दि.२५ ऑगस्ट च्या सकाळी ०६:०० वा. तलावाचे पाण्यात तरंगत असतांना मिळुन आले मृतक हा तलावाचे पाण्यात आंघोळ करतांना पाण्यात बुडुन मरण पावला. अशा फिर्यादी जयकुमार गजबे रा. भिवखिडकी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे दिनांक २५ ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता दरम्यान मर्ग दाखल करण्यात आला आहे.