बोरगाव येथील ग्राम महसूल अधिकारी रणजित अर्जुन घाटेराव वय ३२, रा. अहिरे कॉलनी, सातारा याला सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना दि. ९ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले.याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव नजीकच्या टकले, ता. कोरेगाव येथील गट क्रमांक १०० मधील ९० गुंठे शेती वारसा नोंदणीसाठी घाटेराव याने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती.