दिग्रस येथील अरुणावती धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून सध्या धरण ८५ टक्क्यांपर्यंत भरले आहे. हवामान खात्याने येत्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्याने अरुणावती धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही क्षणी धरणाचे गेट उघडून नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते, अशी माहिती आज दि.२८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान अरुणावती पाटबंधारे विभागाने दिली आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.