शहरातील पंचायत समिती भवन येथे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेला आमदार प्रकाश भारसाकळे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.यावेळी ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,या सर्वांना आपले गाव उत्कृष्ट कसे होईल या संदर्भात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मार्गदर्शनपर संबोधन केले.मंचावर पंचायत समीतीच्या गटविकास अधीकारी तथा प्रशासक माया वानखडे,व पंचायत समीती अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.