तुमसर तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र चुल्हाड येथे आज दि. 24 सप्टेंबर रोज बुधवारला सकाळी 11 वा. ते दुपारी 2 वा. पर्यंत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत रोगनिदान शिबिर घेण्यात आला. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती रमेश पारधी व जि.प. सदस्य राजेंद्र ढबाले यांच्या उपस्थितीत स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी सरपंच चंदा ठाकरे, ग्रा.पं. सदस्य पार्वता बनसोड, दुर्गा तितीरमारे, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते.