शिवणफळ व टेकडी मागील परीसरात वाघाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक गोरा व एक गाय वाघाने ठार केली आहे.प्राप्त माहितीनुसार शिवणफळ येथील अरुण शिंदे यांचे जनावरे शिवणफळ जंगलातील कक्ष क्रमांक ३१७ मध्ये चरायला गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने गीर जातीच्या २५ हजार रुपये किमतीच्या गोऱ्यावर हल्ला चढवित ठार केले.तर टेकडी मागे चरायला गेलेल्या किसना अंबाडरे यांच्या २० हजार गायीवर हल्ला चढवित वाघाने गायीला ठार केले.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गांवडे यांनी भेट दिली.