आज मंगळवार 9 सप्टेंबर रोजी छावणी पोलिसांनी माहिती दिली की, 8 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता महिला फिर्यादी जाता गुलाबचंद बनस्वाल राहणार नंदनवन कॉलनी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, सात सप्टेंबर रोजी छावणी परिसरात गणपती विसर्जन ची मिरवणूक बघत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरी करून नेले आहे, याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.