सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे या पार्श्वभूमीवर आज पोलीस, महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मिरजकर तिकीट,महाद्वार रोड, गंगावेश, रंकाळा हा संपूर्ण मार्ग पायी चालत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते दरम्यान मिरवणूक मार्गावरील अडथळे काढण्याच्या सूचना केल्यात.