जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीबाई पवार आणि वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे. भारतीबाई पवार यांनी वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याचबरोबर मराठा समाजाबद्दल देखील अपशब्द वापरले आहेत. ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री 12 च्या दरम्यान भारतीबाई पवार यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला