भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय परसोडी येथे ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन कार्यक्रम दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान पार पडला. यावेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय निर्देशक सचिन शेंडे, उपमहा प्रबंधक अंजना शामनाथ, युनियन बँक ऑफ इंडियाचे आंचलित प्रबंधक गौरव कुमार, ग्रामपंचायत परसोडीचे सरपंच पंकज सुखदेवे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर ग्रामपंचायत मधील पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.