परभणी जिल्ह्यातील थडी उकडगाव येथील सरपंच सौ. अनुराधा लहूपुरी यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या मदतीसाठी हातभार लावत, त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या एक महिन्याच्या मानधनाचा धनादेश पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते नऊ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला. अशा संवेदनशील व समाजाभिमुख कृतीमुळे ग्रामपातळीवर जनसेवेची खरी भावना अधिक दृढ होत आहे.