दि.19 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय इमारत,जयस्तंभ चौक गोंदिया येथे माँ जिजाऊ महिला औद्योगिक सह.संस्था द्वारा संचालित उपहार गृह चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आ.विनोद अग्रवाल यांनी संस्थेच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या तसेच खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. या कँटीनमधे इतर पदार्थांसह अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ उपलब्ध असणार आहे. त्यामुळेही उपहारगृह सर्वसामान्यांसाठी हिताचे ठरणार आहे. - आमदार विनोद अग्रवाल