पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी 15 तारखेला बैठक; न्यायासाठी संघटनेचे आव्हानपंतप्रधान पीक विमा 2024 अंतर्गत नुकसानभरपाई न मिळालेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 15 सप्टेंबर रोजी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. विमा न मिळालेल्या, कमी मिळालेल्या किंवा पोर्टलवर माहिती न दिसणाऱ्या शेतकऱ्यांनी तक्रार आयडी आणि विमा पावतीसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एचडीएफसी अॅग्रो विमा कंपनीचे प्रतिनिधीही बैठकीस हजर राहणार आहेत.