आज दि 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी ला लाडक्या बापाला भक्तांनी निरोप दिला आहे. वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात आज पासून बापाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. वडकी खैरीसह अनेक ग्रामीण भागात वाजत गाजत बापाला निरोप देण्यात आला.विसर्जन दरम्यान वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.