दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान अटकळी शिवारात ता. बिलोली जि. नांदेड येथे, यातील आरोपी मिरा शंकरराव अटकळीकर, रा. वाकड पुणे यांनी व इतर एकाने संगणमत करून शेतीच्या वाटणीच्या कारणावरून फिर्यादीस लाथा बुक्याने पोटात मारून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी शैलेंद्र पि. आनंदराव कुलकर्णी, वय 55 वर्षे, व्यवसाय शेती रा. अटकळी यांचे फिर्यादीवरुन रामतीर्थ पोलीस स्टेशन मध्ये आरोपी मीरा अटकळीकर व इतर एक जनाविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों काळे, हे करीत आहेत.