देवळाली गाव,रोकडोबा वाडी येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून उपनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी रुकसार अमजद शेख राहणार रोकडा वाडी, देवळाली गाव यांच्या पतीसोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून दंगल काकडे, आकाश काकडे उर्फ इलू,धनंजय उर्फ सोनू जयद्रथ काकडे व गोपी उर्फ झंप्या विजू काकडे यांनी संगणमत करून लोखंडी रॉडने व दगडाने फिर्यादी यांच्या पतीला मारहाण केली.