साक्षी महेश अंभोरे वय ३५ वर्षे राहणार मोचीपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या दरम्यान फिर्यादीचा मुलगा राहुल महेश अंभोरे वय सतरा वर्ष हा बाहेर फिरण्यासाठी जातो म्हणून घरून निघून गेला त्याने आजोबाच्या फोनवर घरी येतो म्हणून सांगितले घरी परत आला नसल्याने त्याचा नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र मिळून न आल्याने शहर पोलीस स्टेशनला शनिवार २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारला तक्रारीवरून कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता नुसार नोंद केली असून अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.