राज्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधींचे प्रश्न, समस्यांची आपल्याला जाणीव आहे.त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल,अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी दिली आहे.नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय अधिनस्थ जिल्हा माहिती कार्यालय,नाशिक आणि एचपीटी कला व आरवायके विज्ञान महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एचपीटी महाविद्यालयाच्या कुसुमाग्रज सभागृहात आयोजित करण्यात आले.