औसा- लातूर जिल्ह्यात आज गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे याच दरम्यान आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून औसा ते लातूर महामार्गावरील पेट जवळ असलेल्या तावरजा नदीवर मोठ्या प्रमाणात पाणी आले असल्याने या नदीवर औसा आणि लातूर येतील गणेश भक्त गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या म्हणत तावराजा नदीवर गणेशाचे विसर्जन करण्यासाठी आज रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केलेली होती.