अकोल्यात केवळ दहा दिवसांच्या बाळाला पित्याने जबरदस्तीने आईपासून वेगळं केल्याने खळबळ उडाली होती. पीडित आई मेहरा बानो यांनी पोलिसात तक्रार केली, मात्र दखल न घेतल्याने त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. “माझं बाळ मला द्या,नाहीतर मी स्वतःला काही करेन” असा इशाराही दिला. या घटनेची एनडीटीव्ही मराठीने गंभीर दखल घेत बातमी प्रसारित केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई केली.2 तासांत बाळ आईकडे सुपूर्त करण्यात आलं. बाळाच्या आईच्या वतीने अॅड. प्रवीण कडाळे पाटील यांनी आभार मानले