माण तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील ओसाड हेळकर पठारावर सोमवारी रात्री एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिराबाई दाजी मोटे वय ७५ असे या महिलेचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दहिवडी पोलीस ठाण्यातून बुधवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार संगिता खाशाबा कोळेकर या रात्री घरी गेल्या असता, हिराबाई या घरात आढळून आल्या नव्हत्या.