बेडरपूल येथील बलरामवाले कुटुंबातील दोन लहान मुलांसह पाचजण तोंडाला फेस येऊन बेशुद्धावस्थेत आढळले. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. उपचारादरम्यान रात्री सहा वर्षांचा हर्ष आणि चार वर्षांच्या अक्षराचा मृत्यू झाला त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण जास्त आढळले.