कोल्हापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत शांततेत पार पडावा आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या अधिपत्याखाली दीड हजार पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त कोल्हापूर शहरात असणार आहे या बंदोबस्ताचे वाटप आज पोलीस ग्राउंड वर करण्यात आले.