अमरावती जिल्हा नियोजन समिती सन २०२५-२६ अंतर्गत वार्षिक नियोजन सर्वसाधारण सभा आज २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नियोजन भवन सभागृहात पार पडली. या बैठकीला उपस्थित जिल्हा नियोजन समिती नामनिर्देशित सदस्य तथा अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती महापालिका क्षेत्रात विकासकामांच्या नियोजन संदर्भात डीपीसीमधून मिळवला निधीचा नियतव्ये हा १०० कोटींचा करण्यात यावा, अशी मागणी केलीं.