भंडाऱ्याच्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत बनावट जीएसटी बिल तयार करून सरकारी यंत्रणेची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. २०२० मध्ये बसवलेला ६० टन क्षमतेचा वाहन काटा जप्त करण्यात आला असून, यामुळे समितीला दरमहा ६० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम या कंपनीच्या नावाने बनावट बिल तयार करून वैध मापन शास्त्र कार्यालयात सादर करण्यात आले. त्या कंपनीचा जीएसटी नंबर आधीच रद्द झाला होता, तरीही फसवणूक झाली.