सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव यांची बदली झाली आहे. त्यां सांगलीच्या उपजिल्हाधिकारी पदी रुजू झाल्या आहेत. विजया यादव ह्या सांगलीत २०१८ मध्ये उपजिल्हाधिकारी (महसूल) पदी कार्यरत होत्या. त्यांची बदली झाली. त्या २७ ऑगस्ट २०२४ रोजी सांगली महापालिका उपायुक्त पदी रुजू झाल्या होत्या. वर्षभरातच त्या परत सांगलीच्या उपजिल्हाधिकारी पदी महसूल सेवेत बदली झाली आहे. त्यांनी ३१ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता पदभार घेतला.