७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जन्मलेल्या या शूरवीराने इंग्रजांच्या विरोधात १८२६ ते १८३२ पर्यंत सशस्त्र बंड पुकारले. त्यांचा गनिमी कावा आणि धाडसी नेतृत्व यामुळे इंग्रजांना मोठा धक्का बसला. उमाजी नाईक यांनी आपल्या कृतींनी दाखवून दिले की स्वातंत्र्य हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. त्यांच्या लढ्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा पेटवली. आज, त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या शौर्याला शतशः नमन असे यावेळी सरपंच राहुल काळभोर म्हणाले.