मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत मुंबईकडे कूच सुरु केली आहे. मात्र त्यांच्या या पावलाचा चंद्रपुरात आज दि 26 आगस्ट ला 12 वाजता तीव्र निषेध नोंदवला जात आहे. चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात ओबीसी समाजाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला चपला मारण्यात आल्या .यावेळी ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.