सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस पावले टाकली जात असून, जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी निश्चितच सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या पालकमंत्री कार्यालयातील बैठक सभागृहात मंगळवारी दुपारी तीन वाजता मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विकास आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होत्या.